You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावातील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

हुमरमळा (वालावल) गावातील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

हुमरमळा (वालावल) गावातील मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अतुल बंगे म्हणजे या गावचे विकास पुरुष,,,, डॉ संजय केसरे!

हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सुयश हाॅस्पिटल्ल कुडाळ आयोजित मोफत आरोग्य शिबीर!

हुमरमळा वालावल गावातील विकास पुरुष म्हणून अतुल बंगे यांचे नाव घेतले जाते म्हणुनच आरोग्या बरोबर शासकिय योजना या गावात चांगल्या राबवल्या जातात असे गौरवोद्गार डॉ संजय केसरे यांनी काढले
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सुयश हाॅस्पिटल्ल कुडाळ आयोजित मोफत आरोग्य शिबीराल पडोसवाडी येथे संदेश जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉ केसरे बोलत होते,
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन सरपंच श्री अमृत देसाई व डॉ केसरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी बोलताना डॉ केसरे म्हणाले आपण या गावचे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे त्यामुळे गावातील आरोग्य सुविधा चांगली कशी देता येईल या साठी सर्वजण काम करत आहेत ,
यावेळी सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर, आरोग्य उपकेंद्र अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते यावेळी माजघ ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, संदेश जाधव, डॉ सौ केसरे , ग्रामसेविकाश्रीम अपर्णा पाटिल,व शैलेश मयेकर, अमित बंगे ,माजी ग्रामपंचायत सदस्य श्री शरद वालावलकर, जयसिंग मार्गी , आरोग्य सेवक श्री ओटवणेकर, पोलीस पाटील सुबोध सावंत,भाऊ गुंजकर,नामु चव्हाण, निलेश मार्गी, भिवा गुंजकर आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा