“भरगच्च निधी उभारून त्याचा समाजासाठी उपयोग करू – डॉ. रमाकांत गावडे “
सावंतवाडी :
मायाप्पा बांधव सेवा संघाची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मा.अध्यक्ष सुभाष भाई यांच्या अध्यक्षतेखाली हक्काच्या नूतन मायाप्पा भवन चौकूळ या वास्तू मध्ये नुकतीच संपन्न झाली. या सभेत २०२४ पासून २०२९ पर्यंत या ५ वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी स्थापन केली. नूतन अध्यक्ष म्हणून डॉ. रमाकांत गावडे यांची नेमणूक केली तर खजिनदार म्हणून माजी सैनिक अर्जुन गावडे, सचिव सुरेश गावडे आणि उपाध्यक्षपदी नंदू गावडे यांची निवड करण्यात आली. याशिवाय इतर सदस्यय मिळून १५ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली. डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अशी खंत व्यक्त केली की गेली १४ वर्षात सभासद संख्या ४००हून अधिक असूनही फार मोठा निधी संकलित करू शकलो नाही. म्हणून सभागृहास सूचना केली की येणाऱ्या भविष्यात निधी वाढवण्यासाठी काही स्थानिक प्रतिनिधी मार्फत प्रयत्न करावे लागतील. या सभेत आपल्या घराण्यातील श्रीम.समीक्षा सुनील गावडे (केगदवाडी), श्री.रविंद्र गोविंद गावडे (मराठीवाडी), सागर गावडे (नेनेवाडी) या सदस्यांची पुढील ५ वर्षासाठी चौकुळ महसूल गावांसाठी पोलीस पाटील म्हणून शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली. त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच राज्य शासनाच्या २५-१५ लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे या अंतर्गत चौकुळं ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन संस्थेची इमारत बांधण्यात आली. त्यासाठी मा. शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर, माजी अध्यक्ष सुभाष भाई, माजी सरपंच गुलाबराव गावडे, इमारतीचे आर्क्किटेचर राकेश नामदेव गावडे यांचा अभिनंदन ठराव मांडण्यात आला. सर्व प्रथम दरवर्षी प्रमाणे गुणवंत मुलांचा शैक्षणिक यश संपादन केल्याबद्दल शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या वेळी प्रा. रमाकांत गावडे यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री शशिकांत गोविंद गावडे यांची सैनिक पतसंस्थेवर संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सलग तीन वर्ष संस्थेच्या दिनदर्शिका निर्मितीमध्ये जीव ओतून काम करणारे सदस्य व सहकारी, गुणाजी चंद्रकांत गावडे (बबलू), संतोष बरमु गावडे, उत्तम गावडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच कामकाज योग्य रीतीने चालविण्यास सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षानी सभासदांचे आभार मानले व सभा राष्ट्रगीत म्हणून संपविण्यात आली.