You are currently viewing मसुरे डांगमोडे रस्त्याचे आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करा…

मसुरे डांगमोडे रस्त्याचे आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करा…

मसुरे डांगमोडे रस्त्याचे आचारसंहितेपूर्वी काम पूर्ण करा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रशासनाला आदेश..

मालवण
गेली कित्येक वर्षे रखडलेला मालवण तालुक्यातील मसुरे ते डांगमोडे रस्त्याचे डाबरीकरण व रुंदीकरण आचारसंहितेपूर्वी व्हावे, अशी मागणी
डांगमोडे ग्रामस्थांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.

मालवण तालुक्यातील मसुरे गावची वाडी वजा गाव असणाऱ्या डांगमोडे गावात मसुरे डांगमोडे हा रस्ता गेली कित्येक वर्षे रुंदीकरण आणि डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जनसुविधा विशेष अनुदान सन २०२३-२४ अंतर्गत काम मंजूर झाले आहे तसेच निविदा प्रक्रिया होऊन कार्यरंभ आदेश दिला असताना पावसाळ्यानंतर काम सुरू होईल असे प्रशासनामार्फत सांगितले जाते परंतु हे काम निवडणूक आचारसंहितेपूर्वी व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

तसेच डांगमोडे ते वेरली घाटी हा रस्ता तयार करण्यात यावा, हा रस्ता तयार केल्यास मसदे, वेरली, मालोंड व डांगमोडे या गावांचा जनसंपर्क सुलभ होणार असून या रस्त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. तसेच वेरलीच्या घाटीवर हजारो एकर पड असणारे माळरानहीन लागवडी खाली येतानाच ते उपयोगी होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने वेरली घाटी नवीन जोडरस्त्यास मंजुरी देऊन हे काम सुरु करावे, अशी मागणीही पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा