वैद्यकीय अधिकारी संपावर गेलात तर सेवा समाप्त करावी लागेल!!!!

वैद्यकीय अधिकारी संपावर गेलात तर सेवा समाप्त करावी लागेल!!!!

वृत्तसंस्था :

राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन करतानाच, संपात सहभाग घेतल्‍यास तुमची सेवा समाप्त करण्याची कारवाई होऊ शकते असा इशारा प्रशासनाने अस्थायी सेवेतील डॉक्टरांना दिला आहे. अस्थायी सेवेवरील वैदयकिय अधिका-यांची सेवा नियमित करून शासकीय सेवेत समाविष्‍ट करावे. तसेच त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी शासकीय वैदयकिय महाविदयालय व रूग्‍णालयातील वैदयकिय अधिकारी यांनी १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत काळया फिती लावून काम केले.

याउपरही शासनाने दखल न घेतल्‍यास ११ जानेवारी रोजी राज्‍यातील सर्व शासकीय वैदयकिय महाविदयालयातील वैदयकिय अधिकारी एका दिवसाच्या संपावर जातील असा इशारा वैदयकिय महाविदयालय वैदयकिय अधिकारी संघटनेने दिला आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी संपात भाग घेणे गैरवर्तणुक समजण्यात येईल व अशा अधिकारां विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा