You are currently viewing जागर स्त्री नात्याचा

जागर स्त्री नात्याचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जागर स्त्री नात्याचा* 

 

येता उत्सव नवरात्रीचा

करावा जागर स्त्री नात्याचा

आदर भाव मनी ठेवुनी

पहिला मान सन्मान *आईचा*

 

नऊ दिवस नवरात्रीचे

विजय दिवस दसऱ्याचा

कृष्ण होऊनी रक्षण करावे

पाठीराखा असावा *बहिणीचा*

 

भाग्य लाभते पुण्यवानास

*कन्या* रत्न जन्म घेता

नशिबवान म्हणवितो बाप

कन्यादान लेकीचे करता

 

नाजूक *नात* घरात येता

हर्ष होतो आजोबाला

तिच्या पाऊले लक्ष्मी नांदते

प्रेमाने वेड लावते घराला

 

रामाची *पत्नी* दशरथाची *सून*

सीता *वहिनी* प्रेमळ लक्ष्मणाची

लक्ष्मण रेषा न ओलांडता

आब राखते घराची

 

थोर नाते *आजीचे* जवळचे

मोठेपण जपावे घरात

नवनात्यांची माळ गुंफीतो

ओलावा आजीच्या प्रेमात

 

आई समान माया असते

असते ममता *मावशीची*

प्रेम जिव्हाळा नात्यात गुंफतो

आठवण सदा *आत्याची*

 

दूर राहूनही आठवण काढते

*मामी* प्रेमळ भाच्यांची

मामाच्या गावी जाता

मज्जाच मज्जा भाच्यांची

 

नऊ देवींचा नऊ माळांनी

करावा जागर शारदीय उत्सवाला

नऊ नात्यांची माळ गुंफतो

*कवी चंद्रशेखर* नवरात्रीला

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा