You are currently viewing आठवांच्या सोबतीने

आठवांच्या सोबतीने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरविंद कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आठवांच्या सोबतीने*

 

आठवांच्या सोबतीने

वाटचाल जीवनाची

निवृत्तीचे शल्य जरी

झाली तयारी मनाची..(१)

 

सुख आले माझ्या दारी

आनंदात आम्ही सारे

मिळे साहित्याची साथ

आले समाधानी वारे..(२)

 

भूतकाळ आठवता

फेर धरतात शब्द

थोडे चिंतन मनन

व्हावे काहीसे निःशब्द..(३)

 

जगलेले काही क्षण

तोच अनुभव साठा

आत्मपरीक्षण करू

कमी होतो जरा ताठा..(४)

 

आठवांचा आयुष्यात

ठेवा असतो मोलाचा

क्षण सुखाचे हृदयी

तोच आधार सुखाचा..(५)

 

*अरविंद कुळकर्णी*

*मलकापूर*

*जिल्हा – बुलडाणा*

प्रतिक्रिया व्यक्त करा