You are currently viewing आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित घरघुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित घरघुती गणेश दर्शन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

*खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

आयन फिल लॉन्ड्री सर्विस आयोजित ऑनलाईन घरघुती गणेश दर्शन स्पर्धा २०२४चा पारितोषिक वितरण सोहळा त्यांच्या मुंबई येथील मुख्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भारतीय संसदेमध्ये मराठी माणसाची भूमिका, गिरणगावातील कामगारवर्गाची बाजू तितक्याच ताकदीने मांडणारे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ऑनलाईन घरघुती गणेश दर्शन स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर क्षेत्रातून उदंड प्रतिसाद लाभला होता.

आयन फिल लॉन्ड्री सर्विसचे संचालक उदय पवार यांनी मुंबईसह नजिकच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग यशस्वी करत ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. दरवर्षी विधायक पद्घतीने गणेशोत्सवाची परंपरा पारंपारिक पद्घतीने जपताना, कलाकारांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार अरविंद सावंत यांनी बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांचा आत्मविश्वास वाढवत असताना काढले आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मंचावर कामगार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, कामगार संघाचे सरचिटणीस तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त चिटणीस दिलीप जाधव तसेच स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिलीप साटम यांच्यासह आयन फिल लॉन्ड्री सर्विसचे संचालक तसेच युवा उद्योजक उदय अशोक पवार, समाज माध्यम स्पर्धा प्रमुख भरत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रथम पारितोषिक पराग सावंत, द्वितीय पारितोषिक अक्षय चव्हाण, तृतीय पारितोषिक अभिषेक चिटणीस तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक हेरंब जोशी, सिद्धेश साखरकर आणि राकेश पाटील यांना खासदार अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी नेमक्या शब्दांत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करिश्मा सावंत, ज्योती अयरे, वैभव सावंत, अमित बारे, सागर मजरेजर, वैभव पवार आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा