You are currently viewing सावंतवाडी शहरातील सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करा अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल – सरपंच ‌अष्टविनायक धाऊसकर..

सावंतवाडी शहरातील सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करा अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल – सरपंच ‌अष्टविनायक धाऊसकर..

सावंतवाडी शहरातील सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करा अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल – सरपंच ‌अष्टविनायक धाऊसकर..

सावंतवाडी

बुधवार दिनांक ०२/१०/२०२४ रोजी सावंतवाडी मधील आरपीडी रोडवरून जात असताना दुपारी सुमारे १२.३० च्या दरम्यान एका अज्ञात बहानाने धडक देत तेथून पलायन केले. याची माहिती आपण पोलीस स्टेशन सायंतवाडी येथे दिली असता याची शहानिशा करत असताना या रोड वरील सावंतवाडी पोलीस स्टेशन मार्फत आलेली C.C.T.V. यंत्रणा बंध स्थितीत आढळली. ती यंत्रणा त्वरित सुरू करण्यात यावी अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा न्हावेली सरपंच अंकीत धाऊसकर यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.
त्यामुळे अज्ञात वाहनाची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे याचा आर्थिक फटका आपल्याला सोसावा लागला आहे. तरी या पुढे सावंतवाडीतील नागरिकांना जीवितास हानी तसेच अशा इतर समस्याना सामोरे जावे लागेल, याची पोलीस प्रशासन यांनी योग्य ती काळजी घेऊन कार्यवाही न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवाया लागेल. तरी या स्वयंमचलीत C.C.T.V. यंत्रणा सुव्यवस्थित करावी अशी मागणी न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर ‌यांनी केली आहे‌

प्रतिक्रिया व्यक्त करा