You are currently viewing महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती या निमित्त सावंतवाडी नगरपालिका, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल व मिशन रेबीज ऑरगनायझेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा हृदय सत्कार :

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती या निमित्त सावंतवाडी नगरपालिका, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल व मिशन रेबीज ऑरगनायझेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा हृदय सत्कार :

**महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती या निमित्त सावंतवाडी नगरपालिका, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल व मिशन रेबीज ऑरगनायझेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा हृदय सत्कार :**

सावंतवाडी

आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती या निमित्त सावंतवाडी नगरपालिका, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल व मिशन रेबीज ऑरगनायझेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा हृदय सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नगरपालिकेच्या नाडकर्णी मॅडम यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व्यक्त केले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेतील इयत्ता ६ वी तील मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. अस्मी प्रभू तेंडोलकर हिने आपले मनोगत व्यक्त केले. सफाई कामगारांचे सुंदरवाडीच्या सुंदरतेत भर घालण्यासाठीचे योगदान व त्यांच्या स्वच्छतेची ईश्वराकडून त्यांना मिळालेली प्रेरणा यासाठी तिने त्यांचे आभार मानले. इयत्ता २ री तील कु. आकांक्षा उरणकर, इयत्ता ५ वी तील कु. भुवन दळवी, कु. ईशान किनळेकर , कु. आरोही सावंत इयत्ता ३ री तील कु. प्रार्थना नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपले योगदान काय असावे याची थोडक्यात माहिती दिली. आपण जर समाजाचे भान ठेवून स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवला तर सफाई कामगारांवरील अतिरिक्त भार कमी होईल असेही मत व्यक्त केले. तसेच रेबीज आजारावर भाष्य करताना मिशन रेबीज संस्थेचे कार्य देखील अधोरेखित केले. नगरपालिकेतर्फे सफाई कामगारांना हात मोजे देण्यात आले व प्रशालेतील इयत्ता १ ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांनी देखील स्वहस्ते बनविलेली सुंदर ग्रीटिंग कार्ड्स व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. श्रावणी प्रभू यांनी केले. यामध्ये त्यांनी कोविड काळात या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःचा व कुटुंबाचा विचार न करता समाज उपयोगी स्वच्छता यालाच प्राधान्य दिले म्हणून त्यांचे आभार मानले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना व कर्मक्रमात उपस्थित सर्वांनाच उद्बोधित केले. प्रशालेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त केले. यामध्ये, शालेय संचालक श्री. रुजुल पाटणकर यांच्या दूरदृष्टीचा व त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळा तसेच पाठ्यक्रमाव्यतिरिक्तही जगातील बाहेरचे ज्ञान प्राप्त व्हावे व विद्यार्थ्यांंना जलंत प्रश्न समजावे यासाठी संधी प्राप्त करून दिली हा सरांचा उद्देश सर्वांसमोर मांडला. मिशन रेबीज संस्थेचे कर्मचारी अमित नाईक व वसंत तावडे यांचे विशेष आभार मानले. कारण, त्यांचे मार्गदर्शनही सर्वांना फार मोलाचे ठरले. नगरपालिकेच्या नाडकर्णी मॅडम व नाटेकर सर, इतर सर्व पदाधिकारी तसेच मिशन रेबीज संस्था यांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले. सहभागी सहा. कर्मचारी वर्ग, उपस्थित विद्यार्थी, प्रशालेचे सर्व मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राबवलेल्या या उपक्रमांबद्दल शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व ‌ मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा