You are currently viewing मसुरे येथील बीएसएनएल टॉवर मृता अवस्थेत

मसुरे येथील बीएसएनएल टॉवर मृता अवस्थेत

गेले कित्येक महिने 3g 4g सेवा गायब….

 

कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा…

 

मालवण (मसुरे) :

 

मसुरे येथील बी एस एन एल टॉवर अखेरची घटका मोजत असून अवघ्या १०० मीटर अंतरावर नीट रेंज मिळत नाही आहे. याबाबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे वारवार लक्ष वेधून ही अद्याप पर्यंत या प्रश्न संबंधी कोणीही अधिकारी कार्य तत्परता दाखवत नसून फक्त बघण्याचे काम करत असल्यामुळे येत्या आठ दिवसात या टॉवर संदर्भात योग्य ती दुरुस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या मालवण तालुका महिला अध्यक्ष तथा माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.

मसुरे येथे असलेला बीएसएनएल टॉवर गेले कित्येक महिने नादुरुस्त अवस्थेत असून याचा त्रास मसुरे सहित परिसरातील गावातील बीएसएनएल ग्राहकांना होत आहे. अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावर ती थ्रीजी फोरजी सेवा मिळत नसल्यामुळे येथील सर्व शासकीय कार्यालय, तलाठी ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँका, ग्रामपंचायत, परिसरातील शाळा यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून घेतले होते. तथापि या अधिकारी वर्गाने कोणतीही ठोस कृती केलेली नाही. फक्त या प्रश्नाबाबत लवकरात लवकर दुरुस्ती करू असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही कार्यवाही शून्य आहे. या सर्व अधिकारी वर्गाबाबत मसूरे येथील ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेले कित्येक महिने हा टॉवर नादुरुस्त अवस्थेत असूनही याकडे अधिकारी वर्ग लक्ष देत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

येत्या काही दिवसात थ्रीजी, फोर जी सेवेच्या बाबतीत योग्य ती दुरुस्ती न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष तथा मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा