You are currently viewing यशवंत पांडुरंग रावराणे यांना वैभववाडी महाविद्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.

यशवंत पांडुरंग रावराणे यांना वैभववाडी महाविद्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.

यशवंत पांडुरंग रावराणे यांना वैभववाडी महाविद्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य यशवंत पांडुरंग रावराणे यांना वैभववाडी महाविद्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.
खोरकर (अरुळेकर ) रावराणे मंडळाचे संस्थापकीय सदस्य तसेच माजी उपाध्यक्ष, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य व जेष्ठ मार्गदर्शक, लोरेकर ऐक्यवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. यशवंत पांडुरंग रावराणे (YP काका) यांचे सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी सकाळी दुःखद निधन झाले. एक सदैव उत्साही, हसतमुख व कार्यशील व्यक्तिमत्व आपल्यामधून हरपले आहे.
श्री.यशवंतराव रावराणे यांना वैभववाडी महाविद्यालयात संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा