बुलढाणा :
साहित्यिक विश्वात आपल्या विविध उपक्रमाद्वारे प्रसिद्ध असलेला वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहात, वेळो-वेळी विविध विषयावर विविधांगी उपक्रम राबवले जातात.
यात अनेक वेळा महाराष्ट्रासह इतर अन्य राज्यातील साहित्यिक उपक्रमात सहभागी झाले आहेत. तथा प्रत्येक उपक्रमात,वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहात सहभागी साहित्यिकांना समूहाचे सन्मानपत्र देउन गौरवण्यात येते. ‘वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहास साहित्यिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत असल्याने, संस्थापक बबनराव वि आराख यांनी, साहित्यिकाचे आभार व्यक्त केले आहे. दरम्यान, यापुर्वी ‘वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह प्रस्तुत, तथा रोहिणी प्रकाशन संस्था मुंबई द्वारे प्रकाशित व महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला “प्रज्ञासूर्य” काव्यसंग्रहा नंतर, ‘वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहाचा दुसरा काव्यसंग्रह “जीवन माझे” लवकरच प्रकाशित करण्यात येत असून, काव्यसंग्रहाचे विषेश म्हणूजे, येथे प्रत्येक कवी/लेखकांनी ‘काव्यातून स्वपरिचय’ विषयावर विविध प्रकारे आपला जीवन परीचय अधोरेखित केला आहे. याचकारणाने ‘जीवन माझे’ काव्यसंग्रह साहित्यिक क्षेत्रात एक आगळा-वेगळा काव्यसंग्रह म्हणून ओळखले जाईल, यात शंका नाही,असे मत संपादक बबनराव वि.आराख यांनी व्यक्त केले आहे. काव्यसंग्रहात साहित्यिक क्षेत्रातील प्रसिद्ध लेखकासह नवोदित साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून,’जीवन माझे’ काव्यसंग्रह समृद्धी व दखल प्राप्त ठरला आहे.