*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित एकाक्षरी रचना*
अक्षर …..*ल*
लुप्त झाल्या त्या तारका
लांब राहिला चांदवा
लपविते सांजरात
लावू अंतरीचा दिवा।।१
लोपलेली चंद्रकोर
लाजे कशी फांदीमागे
लाल केशरी नभात
लाजताच, रंग जागे।।२
लावू दीप सांजवेळी
लवूनिया नमस्कार
लेकी सुना राहो सुखी
लाल कुंकूच आधार।।३
लपेटून तारुण्याला
लेक लाजवंती बाळी
लवकर उजवते
लौकिकाला गं सांभाळी।।४
अरुणा दुद्दलवार@✒️