You are currently viewing वृद्धत्वाचे आनंदवन

वृद्धत्वाचे आनंदवन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”वृद्धत्वाचे आनंदवन”*

 

जीवन सौंदर्य घेऊन येते अपूर्व वळण

मखमली वळणाने सुरू होते आनंदवनIIधृII

 

अनुभव सरोवरी भूतकाळाचे व्हावे स्मरण

धवल राजहंस विहार करितो मनसोक्त

आठवणींचे उजळणी होती एकांतातII1II

 

जीवन सरिता आतुर असते भेटण्या समुद्र

स्वतःला द्यायची असते स्वतःच सोबत

पैलतीर खुणावतो दिसतो दृष्टिक्षेपांतII2II

 

संपलेल असतं भरभरून वाहणं

संपन्न समुद्रातील उदरी व्हायचे विलीन

सर्व काही असते नभ सागराच्या आधीनII3II

 

मन अपेक्षांच्या ओझ्याशी करावी तडजोड

हेवे दावे आप-पर भाव यांचे जावे पल्याड

निष्काम कर्म करावे सर्वांशी साधावा सुसंवादII4II

 

घ्यायचा सर्व गोष्टींचा घटनेचा साक्षीआनंद

अनुभव कोणी विचारल्यास द्यावा मुक्तपणानं

समदृष्टीने पहावे विश्व व्हावे दुसऱ्या समII5II

 

मन ठेवावे चिरतरुण टाळावी भुणभुण

दुसऱ्यास न ठरावी अडचण जिंकावे मन

अट्टहास सोडावा राहावे सदा आनंदातII6II

 

श्री अरुण गांगल कर्जत.रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा