You are currently viewing विभागीय कलाकार मेळावा 01 ऑक्टोबर रोजी

विभागीय कलाकार मेळावा 01 ऑक्टोबर रोजी

विभागीय कलाकार मेळावा 01 ऑक्टोबर रोजी

देवगड

विभागीय कलाकार मेळाव्याचे मुख्य संयोजक सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन व किसान मोर्चा – भारतीय जनता पार्टी हे आहेत.

64 कलाक्षेत्रातील कलाकार बहुसंख्येने कोकणातच आहेत त्याव्यतिरिक्त रांगोळी, फुगडी, घुमट वादक, शिमगोत्सवातील सोंगें इत्यादी कलाकार अनभिज्ञच आहेत त्यांनाच संघटित करण्याकरीता कलाकार महासंघाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याकरीता विभागवार कलाकार नोंदणी करण्यासाठी व कलाकार महासंघ व अ.भा.म.नाट्य परिषदेची तसेच कलाकार मानधन योजनेची उद्दिष्टे व माहिती देण्यासाठी या विभागीय कलाकार मेळाव्यांचे आयोजन स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून केले जात आहे.
या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शन सिने व नाट्य कलादिग्दर्शक *डाॅ.भाई बांदकर* करणार आहेत. तसेच कला क्षेत्रातील *डाॅ.गुरुदेव परुळेकर* व *डाॅ.कृष्णा बांदकर* या मान्यवरांचेही मार्गदर्शन यामधून मिळणार आहे.
या मेळाव्यात येण्यासाठी किंवा नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नाही तसेच वयाची अट नाही.
कोणत्याही कलेत आपण कार्यरत होतात किंवा आहात हीच पात्रता ग्राह्य धरली जाईल.
कलाकार मेळावा – मंगळवार दिनांक 01 ऑक्टोबर रोजी
*दुपारी 2.30 वा. व्हिक्टोरियस इंग्लिश मेडीयम स्कूल, बौद्ध विहारच्यामागे, तळेबाजार, देवगड.*

*सायंकाळी 6 वा. वाडा हायस्कूल हाॅल, वाडा, देवगड* असे दोन कार्यक्रम होणार आहेत.
आपण व आपल्या परिसरातील कलाकारांना घेवून उपस्थित रहावे अशी विनंती *सुनिलदत्त करंगुटकर* व* जितेंद्र उपरकर* यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा