*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाहिले मी स्वप्न एक*
पाहिले मी स्वप्न एक व्हावयाचे देवतुल्य
भंगला तो स्वप्नगंध राहिले हे एक शल्य ।।१।।
मी उणा नव्हतो कधी अन् कसाही अन् कुठेही
विसरलो इतुके जनांना स्वार्थ मोह हेच मूल्य।।२।।
काय अन् कैसे जगावे मी जनां सांगू कसे ?
ऐकणारा कोण नाही बुद्धि ज्यांची ही अहल्य ।।३।।
सांगण्यासाठीच दुःखे फक्त मी जवळी हवा
समजती स्वतःस सारे या जगी कौटिल्य बल्य ।।४।।
मीच का हे विसरलो हो रुप ही जनता तयाचे
हाय हे जन ही विसरले गौरवास्पद मांगल्य ।।५।।
🌾🌾🌾🌾
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाशिक ४२२०११
मो. ९८२३२१९५५०