*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” स्वरसुमने “*
गानसम्राज्ञी संगीतातील
लौकिकाचा अढळ ध्रुवतारा
अनोख्या पर्वाचा सुरमयी
तेजोमय चमकता सितारा ||१||
मंगेशीचा लख्ख उजळला
सप्तसुरांनी ह्रदयगाभारा
लय, सुर, तालाचा नादमधुर
अनुपम भाव श्रद्धेय नजारा ||२||
नम्र लिनता मोहकता विराजे
शालिन,सोज्वळ बोलका चेहरा
युगायुगातंरी राहे भावविश्वात
गानविश्वातील अनमोल मोहरा ||३||
वैविध्य गीतांचा जादुई आवाज
आनंदी सात्विकतेने फुलविला
जगविख्यात सुरेल पार्श्वगायीका
भारतरत्न स्वरसम्राज्ञीने गौरविला ||४||
शास्त्रीय गायक पिता दीनानाथ
माता माईंच्या उदरी जन्म आगळा
कठीण परिस्थितीत खंबीर सामना
लतादिदींचा आनंदघन संगीत सोहळा ||५||
विविध पुरस्कारांच्या शोभल्या मानकरी
रिझविले श्रद्धाळू मनानां राम भजनातुनी
अभिनेत्री ते गानकोकीळा अद्भूत जीवन
अनोखी स्वरसुमने अर्पिली गायनातुनी ||६||
सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.