You are currently viewing परुळे येथे एक दिवसीय भव्यदिव्य खुल्या भजन स्पर्धाचे आयोजन..

परुळे येथे एक दिवसीय भव्यदिव्य खुल्या भजन स्पर्धाचे आयोजन..

वेंगुर्ला :

परुळे येथे एक दिवसीय भव्य दिव्य खुल्या भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे . श्री देवी वराठी कोरजाई देवस्थान परुळे आणि कला संवर्धन कला प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 17 एप्रिल 2022 रोजी श्री देवी वराठी मंगल कार्यलाय परुळे येथे ही खुली भजन स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धासाठी प्रथम पारितोषिक रु 5000 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 3000 व चषक, तृतीय रु 2000 व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसेउत्कृष्ट गायक,  वादक, चकवा वादक,  संवादिनी वादन यांना प्रत्येकी रु 700 व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी श्री दिवाकर घोगळे 8767669592 व जयवंत राऊळ 9403072595 यांच्याशी 12 एप्रिल पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष माऊली सावंत, कोषाध्यक्ष शंकर चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा