You are currently viewing “लोकसंस्कृती हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा!” – डॉ. अरुणा ढेरे

“लोकसंस्कृती हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा!” – डॉ. अरुणा ढेरे

*”लोकसंस्कृती हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा!” – डॉ. अरुणा ढेरे*

पिंपरी

“लोकसंस्कृती हाच भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे!” असे विचार ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी शाहीर योगेश लोककला रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना डॉ. अरुणा ढेरे बोलत होत्या. पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांचे साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक – सांस्कृतिक योगदानाचे सिंहावलोकन करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी होते. तसेच ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, उद्योजक राजपाल आर्य, उद्योजक श्यामलाल मित्तल, डॉ. प्रभाकर देसाई, रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. प्रवीण भोळे, धोंडीराम पवार, कृष्णा भंडलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे, विनोद बन्सल आदी मान्यवरांची व्यासपीठावर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सभागृहात उपस्थिती होती.

डॉ. अरुणा ढेरे पुढे म्हणाल्या की, “मानवी जीवनाच्या वर्तन व्यवहारासोबत त्याच्या लोकव्यवहाराचा अन्वयार्थ डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या साहित्यातून आणि संशोधनातून लावला होता. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून विद्यापीठाने लोकसाहित्याची शाखा सुरू केली; तसेच शासनाने लोकसाहित्य समितीसारखे मोठे काम कार्यान्वित केले. समाजाला एकसंध करायचे असेल तर लोकसंस्कृतीच्या धाग्यांनी विणता येईल. भौतिक समृद्धीची असंख्य साधने असताना अंत:संस्कृती आणि अंतर्दृष्टीच्या विकासासाठी डॉ. मांडे यांच्या लोकसाहित्य अन् संस्कृतीच्या अभ्यासाला पर्याय नाही. त्यामुळे अभिजन आणि बहुजन यांच्या संस्कृतीची एकत्रित बांधणी करणे शक्य होईल!”

गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या वेदातील ऋचा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रार्थना, स्वागतगीताचे सादरीकरण आणि मान्यवरांच्या हस्ते तुळशीच्या रोपाला जलार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “डॉ. प्रभाकर मांडे यांचे साहित्य अन् संशोधन भटक्या, वंचित, शोषित समाजासाठी काम करताना प्रेरणास्रोत ठरले. दोन दिवसीय चर्चासत्रांच्या माध्यमातून विविध मान्यवर अभ्यासकांनी डॉ. मांडे यांच्या सांस्कृतिक संचितावर ऊहापोह करावा; कारण त्यामुळे गुरुकुलम् मधील शिक्षक आणि विद्यार्थी ज्ञानसंपन्न होतील!” अशी भूमिका मांडली. दरम्यान डॉ. प्रभाकर मांडे लिखित ‘गावगाड्याबाहेर’ या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद आणि ‘लोकसाहित्याच्या अभ्यास वाटेवर’ या दोन ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “परंपरा आणि नवता यांचा समन्वय डॉ. प्रभाकर मांडे यांच्या सांस्कृतिक संशोधनातून अधोरेखित होतो!” असे मत व्यक्त केले. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात परिश्रम घेतले. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा