नवांगुळ यांच्या मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलला मंजूरी द्या – अमोल टेंबकर
महात्मा फुले आरोग्य योजनेतून होणार गोरगरीबांना होणार फायदा
सावंतवाडी :
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ एकाही खासगी रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू नाही. डॉ. राजेश नवांगुळ यांनी आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ती लागू करावी अशी मागणी केली होती. त्यासाठी आवश्यक ऑडीट देखील झालेली असून मंजूरी मात्र मिळालेली नाही. सात वर्षांनी पुन्हा एकदा या योजनेसाठी अर्ज करण्यास त्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे या मागे काही दडलं आहे का ? असा संशय येत आहे असं मत पत्रकार अमोल टेंबकर यांना उपस्थित केला. तर या योजनेला सरकारने मंजुरी द्यावी, जेणेकरून गोवा-बांबोळी व अन्य ठिकाणी इथल्या रूग्णांना जावं लागणार नाही अशी मागणी त्यांनी केली.
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांनी या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी श्री टेंबकर म्हणाले, डॉ. राजेश नवांगुळ यांचे यशराज हॉस्पिटल अॅड मॅटर्निटी होम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेले १८ वर्षे रुग्णांच्या सेवेत असून सर्वप्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्र्यक्रिया केल्या जातात. आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर, पुणे, मुंबई यासारख्या शहरात उपचारासाठी जाणे परवडणारे नसल्याने महाराष्ट्र राज्याच्या महात्मा फुले अंतर्गत या रूग्णालयाला मंजुरी मिळावी व त्यात रुग्णालय समाविष्ट व्हावे यासाठी डॉ. नवांगुळ यांनी अर्ज केला होता. त्यावर अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. स्थानिक आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे ही मागणी केली आहे. आवश्यक ऑडीत देखील झालेलं आहे. मात्र, मंजूरी मिळालेली नसून हा विषय रखडला आहे. त्यात आज तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा या योजनेसाठी अर्ज करण्यास त्यांना सांगितले जात आहे. त्यामुळे या मागे काहीतरी दडले आहे का ? असा संशय येत आहे. या योजनेला मंजुरी द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. जेणेकरून गोवा व अन्य ठिकाणी इथल्या रूग्णांना जावं लागणार नाही. चांगली रूग्णसेवा तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योजनेखाली मिळणार आहे. ही प्रक्रिया झाल्यावर रूग्णालयातील सुविधा देखील मोफत मिळणार असून त्याचा गोरगरीब रूग्णांना फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी ही योजना नवांगूळ यांच्या रूग्णालयाला मंजूरी द्यावी, हा प्रश्न सुटण आवश्यक आहे. सावंतवाडी मल्टीस्पेशालिटीला आमचा विरोध नाही. परंतु ते होईपर्यंत रूग्णांना आरोग्यदृष्ट्या सोय व्हावी यासाठी प्रयत्न व्हावेत. आचारसंहितेपूर्वी ही मंजूरी मिळवी. तसं न झाल्यास पुढची भुमिका जाहीर करू असा इशारा श्री. टेंबकर यांनी दिला. याला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, राष्ट्रवादीच्या सावली पाटकर यांनी पाठिंबा दर्शविला. गोरगरिबांची सोय होणारी योजना देण्यास शासनाला हरकत नाही असं मत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादीच्या सावली पाटकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, उपरकर समर्थक आशिष सुभेदार, बबन डिसोजा, प्रविण गवस, हेमंत पांगम, शुभम केदार, सचिन मोरजकर आदी उपस्थित होते.