You are currently viewing देवबाग येथे आज जागतिक पर्यटन दिन..

देवबाग येथे आज जागतिक पर्यटन दिन..

देवबाग येथे आज जागतिक पर्यटन दिन..

मालवण,

सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी मत्स्यगंधा थिएटर, देवबाग मालवण येथे दुपारी ३ ते ७ या वेळेत जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कोकण विभागाचे पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे आदी उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग पर्यटन वाढीसाठी शॉर्ट फिल्मचे सादरीकरण, पर्यटन धोरण २०२४ यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पर्यटकांसाठी सुरु होणाऱ्या दशावताराचे सादरीकरण, सिंधुदुर्गातील मंदिरांचे ऑनलाईन दर्शन अॅपचे उद्घाटन, ऑनलाईन रिक्षा बुकिंग अॅपचे उद्घाटन, खुली पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण, अपरिचीत सिंधुदुर्ग रिल स्पर्धेचे बक्षीस वितरण, नाविन्यपूर्ण पर्यटन रिसॉर्टधारकांचा सन्मान, पर्यटन क्षेत्रात विशेष कामगिरी बजाविणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू बाबा मोंडकर व सहदेव साळगावकर यांनी केले आह

प्रतिक्रिया व्यक्त करा