You are currently viewing मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेस सौर उर्जा साहित्य संच वाटप

मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेस सौर उर्जा साहित्य संच वाटप

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप गावडे पुरस्कृत वाटप

 

सावंतवाडी :

मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता या जिल्हा परिषद शाळेस भाजपच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सौर उर्जा साहित्य संच वाटप करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप एकनाथ गावडे पुरस्कृत हे वाटप करण्यात आले. तालुक्यातील एकूण ११ जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर व भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव यांच्या पाठपुराव्यातुन हा संच वाटप शारदा विद्यालय शाळेस करण्यात आला. या वाटपावेळी मळगाव माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, भाजप शक्ती केंद्रप्रमुख नीलकंठ बुगडे, बूथअध्यक्ष नरेश उर्फ रुपेश सावंत, बूथ अध्यक्ष सुखदेव राऊळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, सदस्य गौरवी मेस्त्री, शिक्षिका सीमा सावंत,अमित गावकर, विनिता राऊळ, स्वरा वारंग, शिक्षणप्रेमी विजय ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा