जागतिक वारसा स्थळ नामांकन मोहीमेंतर्गत जंजिरे सिंधुदूर्ग किल्ला येथे स्वच्छता मोहीम…!
सिंधुदूर्ग
किल्ले श्री. जंजिरे सिंधुदूर्ग किल्ला येथे रविवारी (२२ सप्टेंबर रोजी) जागतिक वारसा स्थळ नामांकन स्वच्छता महावारसा मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत किल्ल्याच्या महादरवाज्यापासून आसपासच्या परिसरातील गवत तसेच झाडी तोडून साफ करण्यात आली. तसेच शिवराजेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
महादेव मंदिर, भवानी मंदिर, दुधबाव, साखरबाव, दहिबाव या विहिरी परिसरातील गवत झाडी तोडण्यात आली. यावेळी १० टिम बनविण्यात आल्या होत्या. या मोहिमेसाठी शिवप्रेमी ग्रुपचे रमा नाईक याची टिम, सिंधुदूर्ग गिर्यारोहण संघटनेचे अध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, दुर्गमावळाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष गणेश नाईक, कट्टा कॉलेजची मुल, शिवप्रेमी रेडी अभिषेक रेगे आदींची मोलाची साथ लाभली. यावेळी स्वाक्षरी मोहिमसाठी बॅनर लावण्यात आले होते. या मोहिमेत जवळपास २३० शिवभक्तांनी सहभाग घेतला होता. वायरी-भुतनाथ ग्रामपंचायत सरपंच, मालवण तहसीलदार, मेरिटाइम बोर्ड, पुरातत्व अधिकारी यांचेही या मोहिमेसाठी विशेष सहकार्य लाभले. मोहिमेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे विषेश आभार
व्यक्त करण्यात आले. २९ सप्टेंबर रोजी पुन्हा मोहीम राबविण्यात येणार आहे.