You are currently viewing जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

*जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक संपन्न*

कुडाळ

अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव महाराष्ट्राचे सहप्रभारी आणि कोकण विभागाचे इनचार्ज बी.एम. संदिप आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विधानसभा निवडणुकीचे समन्वयक देशराज मीणा यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न झाली. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी.एम.संदिप म्हणाले की राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारतजोडो यात्रा आणि मणिपूर ते मुंबई भारतजोडो न्याय यात्रा यामुळे देशातील वातावरण पूर्णत: बदलून गेले. राहुल गांधी हा देशाचा आश्वासक चेहरा म्हणून देशातील गोरगरीब जनता त्यांच्याकडे विश्वासाने बघू लागली. भाजपने कोट्यावधी रुपये खर्च करून राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न केला होता तो भाजपचा प्रयत्न फसला आणि राहुल गांधी हे उच्च शिक्षित,सुसंस्कृत आणि समजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा प्रामाणिक नेता असल्याची प्रतिमा जनमाणसात निर्माण व्हायला लागली याचे दुख: भाजपच्या नेत्याना आहे म्हणून राहूल गांधींबद्दल खोट्या गोष्टी पसरवून त्यांच्या बोलण्यातील अर्धवट अंश घेऊन अर्थाचा अनर्थ करून राहुल गांधींची बदमानी करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करत आहेत. ते पुढे म्हणाले की, येत्या महाराष्ट्र विधानसा निवडणूकीत महाविकास आघाडीचे सरकार नक्कीच येणार आहे आणि महायूतीचा सुफडासाफ होणार आहे. आपणही सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करावे.यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे विधानसभा निवडणूकीचे समन्वयक देशराज मीणा यांनीही संघटनावाढी संदर्भात मार्गदर्शन कले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य आबा दळवी, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, विलास गावडे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, मिडीया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे, अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष उत्तम चव्हाण,ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, सुगंधा साटम, कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा आफ्रिन करोल, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये,विजय प्रभू, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर, चंद्रशेखर जोशी, प्रवीण वरूनकर, अरविंद मोंडकर, राजेंद्र मसूरकर, सुशील राणे, सिद्धेश परब, विभावरी सुकी, मीनाताई बोडके, अमिदी मेस्त्री, सुमेधा सावंत, माया चिटणीस, जस्मीन लक्शमेश्वर, सुंदरवल्ली पडियाची, पल्लवी खानोलकर, सोनल सावंत, स्वपना वेंगुर्लेकर, संजय लाड, आनंद परूळेकर, अमोल सावंत,प्रकाश डिचोलकर, आनंद पवार, भालचंद्र जाधव, हेमंत माळकर, संदेश कोयंडे,जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, सुभाष दळवी, बाळा धाऊसकर, जगन्नाथ डोंगरे, सुंदर सावंत, आय.वाय.शेख, चंदन हाडकी, प्रथमेश परब, अभिजीत राणे, दिलीप नारकर, संतोष मुंज, पांडुरंग खोचरे,तबरेज शेख, अय्याज खुल्ली, मधुकर लुडबे, अहमद बोबडे,बाळू परब, सुरज घाडी,अमोल राऊळ, समीर वंजारी इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा