You are currently viewing दोनोळी

दोनोळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*

 

*दोनोळी*

(शेर)

 

साधक बाधक नाही मी शिस्तीत मांडतो…

एकेका शब्दाला दोनोळीत बांधतो!

 

आपुलकीने सुनावल्यावर रुसती फुगती…

वाटत जाते काहींना मी फार भांडतो!

 

पाहतो ऐकतो अनुभवतो जे जे काही…

गझलकार आहे तर गझलेतून सांगतो!

 

हेवेदावे गटातटाच्या धानालाही…

प्रेमाने मी प्रेमाच्या उखळात कांडतो!

 

सुखिया होण्यासाठी गझलेला मी वरले…

आनंदाने संसारी जयराम नांदतो!

 

जयराम धोंगडे, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा