कुडाळ न्यायालयात कायदेविषयक फलक अनावरण आणि मार्गदर्शन…
न्यायालय आवारात राबविली स्वच्छता मोहीम:पोलीस, वकील संघटना, न्यायालयीन कर्मचारी यांचा सहभाग..
कुडाळ
दिवाणी न्यायालय (क. स्तर) कुडाळ, तालुका विधी समिती कुडाळ व कुडाळ तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय कुडाळ तेथे दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी नवीन फौजदारी कायदेविषयक माहितीच्या फलकाचे न्यायालयाच्या आवारात अनावरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे कुडाळ यांच्याकडून हा फलक देण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेमध्ये दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) कुडाळ जी ए कुलकर्णी, सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) कुडाळ पी.आर . ढोरे, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, कुडाळ तालुका वकील संघटना अध्यक्षा सौ आर पी नाईक, तसेच इतर विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.
सौ. आर पी नाईक यांचे स्वागत सहाय्यक अधीक्षक सौ. डी.एस.परुळेकर यांनी केले. स्वच्छता वीर म्हणून श्रीमती शर्मिला कदम सफाईगार यांचा सत्कार दिवाणी न्यायाधीश (क स्तर) कुडाळ जी. ए. कुलकर्णी. यांच्या हस्ते, दिलीप रेडकर याचा सत्कार वकील जे. एस. सामंत यांच्या हस्ते, जोगेश चव्हाण यांचा सत्कार वकील डी. एस.सामंत यांच्या हस्ते, श्री. ठाकूर यांचा सत्कार पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर कायदेशीर मार्गदर्शन शिबिरामध्ये मध्ये आदिवासी हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी योजना 2015 या विषयावर दिवाणी न्यायाधीश (क स्तर) कुडाळ जी.ए.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सामुहीक आपत्तीच्या समस्येतील बळी, दुष्काळ अन्न औद्योगिक आपत्ती मुळे बाधित लोकांना भेडसावणाऱ्या कायदेशीर समस्या याविषयी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर )कुडाळ पी आर ढोरे यांनी, पीडित नुकसान भरपाई योजना या विषयावर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तर वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर आर.पी नाईक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर सावंत कनिष्ठ लिपिक यांनी केले व आभार प्रदर्शन सहाय्यक अधीक्षक सौ. डी एस पडळेकर यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विधी स्वयंसेवक यांच्या हस्ते लोकन्यायालय तसेच वरिष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.