You are currently viewing माझी काळी आई…!

माझी काळी आई…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझी काळी आई…!*

 

माझी काळी आई

कां विकली जाते

गावकी भावकी कुळं

जीवाचं रान करते..

 

अपार भोळी काळीआई

सर्वव्यापी परमेश्वर माझी

माती अंगावर शिणवत

बिलगणारी रखुमाई माझी.

 

मूक शब्दांचा सातबारा

भयस्पर्शाने गोठून गेला

पावसापूर्वीच वारा थांबला

गोठा रिकामा झाला

 

मेघ हळवा होऊन

आसवांचा पडदा अंथरला

काळ्याआईचा पाझरलेला ह्दयगंध

मुक्याने विकायला काढला.

 

वेचली फुले आईकरता

भरकटलेल्या प्राणाला पूर्णविराम

अंतहीन अज्ञातात भेलकांडत

काळ्याआईला राम राम..!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

शेतजमीनी विकणा-या शेतकरी बंधूभावापोटी ही रचना!आपला इतिहास नाहीसा झाला की मग काहीचं उरत नाही …..!!!

प्रतिक्रिया व्यक्त करा