कुडाळ :
माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुडाळ भाजप कार्यालय येथे उपस्थित राहून माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, जयंती दळवी, चारूहास दळवी, मुरारी टेमकर, तळगाव ग्रामपंचायत सदस्य श्वेता पेडणेकर, धोंडी दळवी, सुरेंद्र दळवी, एकनाथ तळगावकर, केशव सहदेव तळगावकर, अशोक दळवी, विजय राऊळ, राजू सावंत, महेश फाले, अरुण वालावलकर, सुधाकर तळेगावकर, राजू राणे, सागर फाले, आदी शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, भाजप प्रदेश सदस्य संध्या तेरसे, जगदीश चव्हाण, निलेश तेंडोलकर, विजय कांबळी आदी उपस्थित होते.