You are currently viewing समाजात सकारात्मक बदल होण्यासाठी सावित्रीबाईंच्या आचाराने विचाराने प्रयत्न करुया – श्रीम.वृंदा कांबळी

समाजात सकारात्मक बदल होण्यासाठी सावित्रीबाईंच्या आचाराने विचाराने प्रयत्न करुया – श्रीम.वृंदा कांबळी

शिक्षक भारती सिंधुदुर्ग कणकवली तालुका स्नेहमेळाव्यात १०० पेक्षा अधिक ‘सावित्रीच्या लेकींचा ‘गुणगौरव

तळेरे

भारतीय स्त्रीमुक्तीच्या व स्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा व कार्याचा वसा चालविण्याचे काम प्रत्येक महिलीने करायला हवे,’सावित्रीबाई फुले या आयुष्यभर महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि तशाप्रकारे समाजात सकारात्मक बदल होण्यासाठी त्या अनेक संकटांशी दोन हात करीत राहिल्या,आपण महीलांनीही असेच समाजात योग्य बदल होण्यासाठी सावित्रीबाईंच्या आचाराने आणि विचाराने प्रयत्न करुया असे आवाहन प्रसिद्ध लेखिका व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीम. वृंदा कांबळी यांनी कणकवली येथील कार्यक्रमात केले.श्रीम.
वृंदा कांबळी शिक्षक शिक्षक भारती सिंधुदुर्ग आयोजित कणकवली तालुका स्नेहमेळावात ‘जयघोष सावित्रीचा! सन्मान सावित्रीच्या लेकींचा!!’ या कार्यक्रमात तालुक्यातील उपस्थित महिला शिक्षिकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,सचिव सुरेश चौकेकर,राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. सुस्मिता चव्हाण, सचिव सौ.प्रगती आडेलकर,जिल्हा संघटक समीर परब, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, कणकवली तालुका अध्यक्ष प्रसाद मसूरकर,सचिव संतोष राऊत,कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र नारकर, खारेपाटण हाय- मुख्या-श्री.प्रकाश अकिवाटे, विजयसिंह पोफळे,सौ.रोहिणी मसुरकर,सौ.श्रद्धा कदम तसेच विविध हायस्कूलचे पर्यवेक्षक बयाजी बुराण, श्री.शिंत्रे, श्री.सानप,श्री. कांबळे, तसेच सर्व तालुका अध्यक्ष व सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे तालुकाध्यक्ष प्रसाद मसुरकर व सचिव संतोष राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद मसुरकर यांनी करीत शिक्षक भारतीच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली
तालुका स्नेहमेळाव्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या व सावित्रीबाईंचा वसा पुढे चालविणाऱ्या सुमारे १०० अधिक महिलांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गुणगौरव करीत त्यांचा यथोचित सन्मान केला.
तसेच शिक्षक भारती आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गुणगौरव या सोहळ्यात करण्यात आला. याशिवाय तालुक्यातील विविध माध्यमिक शाळेतील नूतन मुख्याध्यापक व पर्यवेक्षकांचाही गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला तसेच कुर्ली येथील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी श्री.फोंडेकर यांचाही संघटनेच्यावतीने शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला.तळेरे हायस्कूलच्या शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेत प्रवेश केल्याने त्यांचाही यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान विद्यामंदिर हायस्कूल कणकवलीच्या सौ. केळुसकर यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित *’एकपात्री नाट्यप्रयोग’* व कासार्डे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सानिका मारकड हिने शिक्षक भारती संघटनेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणारी *’स्लाईड शो’चे* सादरीकरण केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर,
प्रशांत आडेलकर सी.डी.चव्हाण,संदीप कदम सौ.देसाई आदींनी मनोगत व्यक्त करीत स्त्रीयांच्या कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव करीत मार्गदर्शन केले. तसेच
मुख्या. श्री.राजेंद्र नारकर, सत्कारमूर्ती महिला शिक्षिका प्रतिनिधी…. व शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक भारतीच्या बहुउपयोगी कार्याचे विशेष कौतुक करीत शिक्षक भारतीला धन्यवाद दिले. सूत्रसंचालन श्री.महादेव मोटे यांनी तर आभार श्री.घुगे यांनी मानून या मेळाव्याची सांगता केली.

नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलन उभारावे लागणार: आम. कपील पाटील

कोरोनाच्या महामारीत शिक्षकांनी फार मोठे योगदान दिले असून ते कौतुकास्पद आहे असे सांगून, शासनाची सध्या सुरू असलेली चुकीची शैक्षणिक वाटचाल तसेच नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटी व या अन्यायकारक धोरणांविरुद्ध भविष्यात मोठे आंदोलन उभारावे लागेल असे मत आम. कपील पाटील यांनी या मेळाव्यात उपस्थितांना आॅनलाईन मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 14 =