You are currently viewing कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या मुलभुत प्रश्नांचा सकारात्मक विचार करू

कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या मुलभुत प्रश्नांचा सकारात्मक विचार करू

*कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या मुलभुत प्रश्नांचा सकारात्मक विचार करू*

… नुतन जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील यांचे आश्वासन..

पस्तीस वर्षापूर्वी तत्कालीन मंत्री स्व. एस्. एन् देसाई यांनी जिल्ह्यातील भूमीपुञानां उद्योगांच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच छोट्या मोठ्या नव उद्योजकांना आपले उद्योग उभारता यावे या उद्देशाने सुमारे २७८ हेक्टरमध्ये कुडाळ औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. या ओद्योगिक वसाहतीत साधारणपणे नवशेहून जास्त भूखंडाचे वाटप झाले. मात्र त्यापैकी तीनशेच्या आसपास उद्योग सुरु आहेत. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात टिकून राहायाचे असेल तर राज्य सरकारच्या माध्यमातून काही आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. सुरळीत विद्युत पुरवठा ही अत्यावश्यक बाब असून अशा मुलभूत प्रश्नावरं प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी आज कुडाळ औद्योगिक वसाहतीचे शिष्टमंडळ जिल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील यांची सदिच्छा भेटले. मा जिल्हाधिकारी यांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित समस्यांबाबत प्राधान्याने सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, जेष्ठ सल्लागार आनंद बांदिवडेकर, सहकार्यवाह श्री कुणाल वरसकर,सदस्य श्री संजीव प्रभू, श्री राजन नाईक, श्री मुश्ताक शेख उपस्थित होते.

*फोटो- कुडाळ एम्. आय्. डी. सी. असोसिएशनचे पदाधिकारी*

प्रतिक्रिया व्यक्त करा