You are currently viewing वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या स्वच्छतेवर आधारित पथनाट्याला चांगला प्रतिसाद

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या स्वच्छतेवर आधारित पथनाट्याला चांगला प्रतिसाद

*वामनराव महाडिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे दिला स्वच्छतेचा संदेश*

 

 *वामनराव महाडिक विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम: ग्रामसेविका राजलक्ष्मी जाधव*

कणकवली :

 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,परिषद सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये “स्वच्छता ही सेवा” ही मोहीम दि.  १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ रोजी या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येत आहे. याचे औचित्य साधून वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे ,ता. कणकवली च्या विद्यार्थ्यांनी “स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता” या थीमवर आधारित तळेरे रिक्षा स्टॅन्ड येथे पथनाट्य सादर केले.

यावेळी कणकवली पंचायत स. माजी सभापती व कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण, माजी सरपंच व शाळा समिती सदस्य प्रविण वरुणकर, उमेश कदम, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.प सदस्य शैलेश सुर्वे, दिनेश मुद्रस, ग्राम.पं.सदस्य सचिन पिसे, संदीप घाडी, शर्वरी वायंगणकर, तळेकर, जि.प.शाळा तळेरे नं.१ चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव यांचेसह ग्रामसेविका राजलक्ष्मी जाधव, वैद्यकीय अधिकारी जाधव, वैद्यकीय कर्मचारी आंबेरकर, तळेकर, आरोग्य सेवक मांडवकर, आरोग्य सेविका सुचिता परब, तलाठी कोळपकर, ग्रामपंचायत कर्मचारी बाबू मेस्त्री, ग्रामपंचायत स्वछता कर्मचारी बाळकृष्ण तांबे उपस्थित होते.

प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी हे स्वच्छतेचे पथनाट्य सादर करत समाजाला स्वच्छतेचा आदर्श घालून दिला असे मत ग्रामसेविका राजलक्ष्मी जाधव यांनी मांडले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून या पथनाट्यासाठी प्रशालेचे संगीत शिक्षक अजित गोसावी, सहा.शिक्षिका सुचिता सुर्वे, प्राध्या.नम्रता गावठे तसेच विद्यार्थी – आयुष सुतार, शमिका ढेकणे, प्रांजल साठम, मृण्मयी तळेकर, श्रद्धा तांबे, मयुरी शिर्सेकररिया राठोड, वैष्णवी चव्हाण, समीक्षा पाटणकर, चैताली तळेकर, चैत्राली चिंचवलकर, राज मुद्रस, सुचित वरूणकर, आर्या भोगले, रक्षा भोगले, केतकी वांगणकर,यांनी खूप प्रयत्न केले.

या पथनाट्यासाठी तळेरे ग्रामस्थ, पालक यांनी चांगला प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली. प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्राचार्य अविनाश मांजरेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा