You are currently viewing राष्ट्रीय पातळीवरील फाईड ब्लिट्झ ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनमधील विद्यार्थ्याने घेतली उंच भरारी*

राष्ट्रीय पातळीवरील फाईड ब्लिट्झ ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनमधील विद्यार्थ्याने घेतली उंच भरारी*

राष्ट्रीय पातळीवरील फाईड ब्लिट्झ ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत स्टेपिंग स्टोनमधील विद्यार्थ्याने घेतली उंच भरारी**:

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मधील इयत्ता सहावीतील ‘ कु. सोहम देशमुख’ या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पातळीवर आयोजित केलेल्या फाईड ब्लिट्झ ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत कौशल्य आणि प्रशंसनीय कामगिरीचे प्रभावी प्रदर्शन केले. ही स्पर्धा १३ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी पणजी गोवा येथे आयोजित केली होती. शैक्षणिक वर्ष २०२४ मधील या राष्ट्रीय पातळीवरील फाईड ब्लिट्झ ओपन रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत प्रशालेतील कु. सोहम देशमुख या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. याकरिता त्याचा पालकांचे, प्रशालेचे क्रीडा शिक्षक समद शेख व हमीद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी कु. सोहम देशमुख याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा