You are currently viewing जि.प.शाळा नं.४, सावंतवाडी येथे “काव्यलेखन” उपक्रमात बालकवींमध्ये दिसले भविष्यातील साहित्यिक

जि.प.शाळा नं.४, सावंतवाडी येथे “काव्यलेखन” उपक्रमात बालकवींमध्ये दिसले भविष्यातील साहित्यिक

*”आम्ही बालकवी” संस्थेचा स्तुत्य उपक्रम*

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्हयात कार्यरत असणारी “आम्ही बालकवी” ही संस्था गरजू विद्यार्थ्याना प्रासंगिक मदत करणे, नवीन साहित्यिक घडावेत, मुलांना वाचन लेखनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम घेत असते. दि. २० सप्टेंबर२०२४ रोजी जि.प शाळा सावंतवाडी नं ४ येथे आम्ही बालकवी या संस्थेच्या माध्यमातून “काव्यलेखन” हा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेण्यात आला. यावेळी बालकवी संस्थेचे अध्यक्ष कवी राजेंद्र गोसावी यांनी विद्यार्थ्याना काव्यलेखनाबाबत मार्गदर्शन केले.

सदर काव्यलेखन उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी व मालवणी अशा दोन्ही भाषेत कु.सुरभी सावंत, कु सिया शेटकर, आराध्या, ममता घाडी , हर्ष गोसावी , पियुष या व सर्वच बालकवींनी उत्तम काव्यलेखन करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्याना आम्ही बालकवी संस्थेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले तसेच खाऊ वाटप देखील करण्यात आले.

सदर काव्यलेखन कार्यक्रमाचे आयोजन “आम्ही बालकवी” समूहाचे सदस्य श्री.कृष्णा गोसावी यांनी केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, बालकवी समूह सदस्या कु. सिध्दी बोंद्रे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा