You are currently viewing साटेली तर्फ सातार्डा येथे शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या विविध योजनांची माहिती…

साटेली तर्फ सातार्डा येथे शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या विविध योजनांची माहिती…

साटेली तर्फ सातार्डा येथे शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीच्या विविध योजनांची माहिती…

सावंतवाडी

तालुक्यातील साटेली तर्फ सातार्डा गावात शिवसेनेच्या वतीने महायुतीच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजनांची माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर, तालुका उपसंघटक संजय गावडे, मळगांव उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, बुथप्रमुख एकनाथ हळदणकर, सरपंच सौ. श्रावणी नाईक, आबा नाईक, प्रकाश नाईक, ऋषिकेश नाईक, दिव्यांका नाईक, माजी सरपंच सौ. रंजना नाईक, राजन नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा