You are currently viewing आडाळीतील रखडलेल्या वनौषधी प्रकल्पासाठी केंद्रीय आयुष मंत्र्यांकडे पाठपुरावा करा – पराग गांवकर

आडाळीतील रखडलेल्या वनौषधी प्रकल्पासाठी केंद्रीय आयुष मंत्र्यांकडे पाठपुरावा करा – पराग गांवकर

आडाळीतील रखडलेल्या वनौषधी प्रकल्पासाठी केंद्रीय आयुष मंत्र्यांकडे पाठपुरावा करा – पराग गांवकर

शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडे निवेदनाव्दारे मागणी…

दोडामार्ग

आडाळीतील रखडलेल्या केंद्रीय वनौषधी संस्था प्रकल्पासाठी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी सरपंच तथा आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष पराग गांवकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.

त्यात असे म्हटले आहे की, श्रीपाद नाईक केंद्रीय आयुषमंत्री असताना त्यांनी २०२१ मध्ये ‘राष्ट्रीय वनौषधी संस्था’ प्रकल्प मंजूर केला. तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आडाळी एमआयडीसीत ५० एकर भूखंड प्रकल्पासाठी हस्तातरित करण्यात आला. मात्र त्यानंतर गेल्या तीन वर्षात प्रकल्पाबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे समितीच्या वतीने प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता केंद्रातील आयुष मंत्रालयाचा कार्यभार शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे. त्यामुळे येथील प्रकल्पाबाबत राज्यस्तरावरून पाठपुरावा झाल्यास प्रकल्पाचे काम मार्गी लागू शकते. त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे श्री. गांवकर यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी आपण स्वतः या विषयात लक्ष घालून मंत्री जाधव यांच्याकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासन मंत्री केसरकर यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा