*भाजपा युवा मोर्चा सचिव संजय नाईक यांच्या घरी २१ दिवस गणराया विराजमान*
साटेली तर्फ सातार्डा:
सावंतवाडी तालुका भाजपा युवा मोर्चा सचिव तथा कोकण सम्राट ग्रुपचे सर्वेसर्वा संजय नाईक, कातवडवाडी, साटेली तर्फ सातार्डा येथे २१ दिवस गणेश विराजमान झाला असून सर्व भाविक भक्तगणांनी, मित्र मैत्रिणी, सगेसोयरे आदींनी श्रीगणरायाचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री संजय नाईक व कुळघरातील नाईक यांनी केले आहे.
कोकणातील अकरा दिवसांच्या गणेशाचे विसर्जन झाले असून काही मोजक्याच घरांमध्ये २१ दिवस गणराया विराजमान असतात. २१ दिवस नित्यनेमाने गणरायाची पूजा आरती आणि भजन आदी कार्यक्रम पार पाडले जातात. त्यामुळे घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. गणेशोत्सवातील हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी गणरायाचे दर्शन घ्यावे असे संजय नाईक यांनी आवाहन केले आहे.