संविधान मंदिर स्थापना उदघाटन सोहळा संपन्न…
बांदा
सावंतवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग यांच्या आदेशान्वये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून, भारतीय संविधानाचा गौरव करत, संविधान मंदिर स्थापना उद्घाटन सोहळा सर्व महाराष्ट्र राज्यातील ४३४ औद्योगीक प्रशिक्षण संस्थात एकाचवेळी संपन्न करण्यात आला.
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९०४ ते १९०७ या काळात ज्या एल्फिन्स्टन टेक्नीकल स्कूल येथे शिक्षण घेतले, त्याठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
कौशल्य विकास विभागाअंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण झाले. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते देशातील औद्योगिक शिक्षण देणारी पहिली शाळा एल्फिन्स्टन तांत्रिक प्रशिक्षण हायस्कूल येथे संविधान मंदिराचे उद्घाटन संपन्न झाले. या सर्वांचे थेट प्रक्षेपण सर्व ४३४ औद्योगीक प्रशिक्षण केंद्रात झाले, त्यास अनुसरुन औद्योगीक प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी येथे हे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
याप्रसंगी सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष राजन पोकळे, साक्षी वंजारी, समीर वंजारी, अजय गोंदावळे, विनोद सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पुंडलिक दळवी, श्री. सातपुते तसेच संस्थेचे प्राचार्य एन. डी. पिंडकुरवार, आर.ए.जाधव (गटनिदेशक), आर. ए. जाधव (गटनिदेशक), वरिष्ठ लिपिक आर. जी. माळकर, शिल्पनिदेशक यू. डी. दाभोलकर, सुचिता नाईक तसेच व कर्मचारी वर्ग, प्रशिक्षणार्थी व पालक आणि सावंतवाडीतील नागरिक उपस्थित होते.
संविधान उदघाटन प्रसंगी ‘भारताचे संविधान’ या विषयावर संस्थापक अध्यक्ष अभिनव दर्पण बांदा, व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग प्रकाश तेंडोलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुमारे तीन तास त्यानी संविधान म्हणजे काय, संविधानाचा इतिहास, महत्त्वाचे अनुच्छेद, आरक्षण तत्व, संविधानाचे महत्त्व, संविधान कार्यपद्धती, संविधान समज गैरसमज, संविधानाचे जतन व जनजागृतीचे महत्त्व या मुद्यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरे स्वरुपात संवाद साधला.
तहसीलदार पाटील यांनी संविधानाबाबत आपले विचार मांडले. संविधान प्रत्येक नागरिकाला माहित असण्याची गरज स्पष्ट केली. प्रवीण भोसले यांनीही संविधान जनजागृतीची गरज अधोरेखीत केली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी, निर्मिती आणि इतिहास सांगितला व प्रगतीच्या दृष्टिने मार्गदर्शन केले.
राजन तेली यांनीही संविधानाबाबत विचार मांडले. संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. राजन पोकळे, ऍड. समीर वंजारी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध रांगोळी, वक्तृत्व, निबंध स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. नितीन पिंडकुरवार यांनी आभार मानले.