You are currently viewing एक कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त : अमरावतीच्या डॉ. निधि पांडेय 

एक कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त : अमरावतीच्या डॉ. निधि पांडेय 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी काल दिनांक १९ सप्टेंबर रोजी अमरावतीच्या कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय यांचा सत्कार केला. या सत्कार प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व दुसरे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसेच दिलीप वळसे पाटील व अन्य मान्यवर हे उपस्थित होते. शासन आपल्या दारी आणि महिलांना स्वतःचा पायावर उभे करण्यासाठी महिला सक्षमीकरण या क्षेत्रात केलेल्या आगळ्यावेगळ्या व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आलेला आहे. आपण जर विभागीय आयुक्तांना भेटला असाल तर मुख्यमंत्र्यांनी केलेला हा गौरव यथार्थ आहे असेच वाटेल. असे डॉ.निधि पांडेय यांचे वागणे आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी प्रशासकीय योजना राबविण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. शासनाच्या अनेक योजना असतात. बऱ्याच योजना ह्या कागदावरच राहतात. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम अधिकारी असणे गरजेचे असते. डॉ. निधि पांडेय यांनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरून सतत दौरे करून पाचही जिल्ह्यांना सक्षम केले आहे. आणि म्हणूनच मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व उप मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या कार्याची दखल घ्यावी लागली. मी स्पर्धा परीक्षेच्या जगतात असल्यामुळे मला मॅडम ला भेटण्याचा त्यांच्या कार्याचा तत्परतेचा शालिनीतेचा विनयशीलतेचा अनेक वेळा प्रत्यय आला. म्हणतात ना जितने वाले कोई अलग काम नही करते व हर काम अलग ढंग से करते है. या न्यायाने त्यांनी प्रामाणिकपणे निष्ठेने तन-मन-धनाने काम केले आहे व त्या करीत राहणार आहेत. अशा पुरस्कारांमुळे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळते आणि ती व्यक्ती अधिक जोमाने काम करायला लागते. डॉ.निधि पांडेय यांच्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाला विशेष सवय लागली आहे. तुम्ही जर या कार्यालयात गेले तर त्याचा अनुभव तुम्हाला येईल. आज कोणती कामे करावयाची आहेत .ती झाली की नाही .त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये मॅडम सतर्क आहेत. मॅडम जरी दौऱ्यावर असल्या तरी त्यांचे कार्यालयीन स्वीय सहाय्यक श्री लवनकर व स्टेनो त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून कामाचा पाठपुरावा करीत असतात. त्यांच्याकडे तशी यादीच असते. मी जेव्हा त्यांच्या कार्यालयात फोन करतो. फोन एंगेज आला आणि आपण फोन ठेवून दिला. तरी त्यांचे स्वीय सहाय्यक श्री लंवनकर परत आपणास रिकॉल करतात आणि चौकशी करतात. इतकी तत्परता फार कमी ठिकाणी पहावयास मिळते. मी जेव्हा जेव्हा मॅडमला भेटलो तेव्हा तेव्हा त्यांच्या कार्य तत्परतेचा विनयशीलतेचा अनुभव मला येत गेला. माझे आयएएस करणारे विद्यार्थी श्री प्रशांत भाग्यवंत यांचे अकोला महानगरपालिकेमध्ये एक नियमात बसणारे काम होते. पण त्याला विलंब लागत होता. मी मॅडमच्या कानावर ही गोष्ट घातली. मॅडमनी लगेच तिथल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन लावला. ज्या कामाला तिथे महिने लोटले होते.

ते काम मॅडमनी फोन केल्यामुळे लगेच झाले. प्रशांत आयएएस करीत आहे. त्याने तीन वेळा आय ए एस चा इंटरव्यू दिलेला आहे .हे ऐकून त्यांनी लगेच प्रोबेशन वर असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांची त्याची भेट करून दिली आणि प्रशांतला मार्गदर्शन करण्यास सांगितले. तुम्ही मॅडमला भेटावयास गेलात आणि मॅडम कार्यालयात जर असल्या तर तुमची ताबडतोब भेट होते. तुम्हाला थांबावे लागत नाही. मॅडम तुमचा प्रश्न समजावून घेतात आणि त्यावर तात्काळ अंमलबजावणी करतात. त्यामुळे त्यांच्याकडे पेंडिंग अशी कामे फारच कमी असतात. नाहीतर आपण अनेक कार्यालयात गेलो तर अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईलची थप्पी लागलेली असते. तसा प्रकार आपल्याला येथे दिसणार नाही .याचे कारण मॅडमची तत्परता व कर्तव्य दक्षता. तुम्ही मॅडमला भेटला तर मॅडम कायमच्या तुमच्या स्मरणात राहतील एवढे त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. एक परिपक्व अधिकारी कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून आपल्याला मॅडमचा उल्लेख करावा लागेल. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विनम्रपणे स्वागत करणे त्यांचा प्रश्न समजून घेणे वेळ असेल तर त्याचे योग्य आदरतिथ्य करणे ही त्यांची कामे हृदयाला स्पर्श करून जातात. खरं म्हणजे पाच जिल्ह्याचा कार्यभार सांभाळायचा म्हणजे ही तारेवरची कसरत आहे. त्यातून ही मंत्रालयातून होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग . मंत्रालयातून येणारे फोन. लोकप्रतिनिधींचे फोन. त्याला ताबडतोब परिपूर्ती करण्याचे आदेश. हे सर्व त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळून घेतले आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलो की प्रत्येक भेट लिहून ठेवण्यासारखी आहे. माझ्या सुरुवातीच्या भेटीमध्ये तर त्या खुर्चीवरून उठून दारापर्यंत मला सोडायला आल्या. सर्व स्टाफ पाहतच राहिला.एक वेळ मी डॉ. उल्हास संगई यांच्याबरोबर त्यांना भेटावयास गेलो. उल्हास संगई निघून गेले.अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आल्या. त्यांच्याशी चर्चा सुरू होती.आमच्या चर्चेदरम्यान मॅडमला कळले की मी गाडी आणलेली नाही. मॅडम मला म्हणाला चला मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडते. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर त्या मला घरी येऊन गेल्या. चहापान झाले.त्या चालकाला म्हणाल्या सरांना घरी सोडून या.मी जसा गाडीमध्ये बसायला लागलो तसा त्यांचा बॉडीगार्ड माझ्याजवळ आला.या साईडने मॅडम बसतात .तुम्ही त्या विरुद्ध साईडने बसा .असा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. मॅडमच्या ते लक्षात आले. मॅडम त्याला म्हणाल्या सर याच बाजूने बसतील. त्यांनी स्वतःची जागा मला देऊन मनाचा मोठेपणा दाखविला होता आणि म्हणूनच आज जेव्हा त्यांना मा. मुख्यमंत्र्यांनी गौरविले तेव्हा एका चांगल्या विभागीय आयुक्तांचा गौरव झाल्याचा आनंद आम्हाला होणे साहजिकच आहे. त्यांना उत्तर उत्तरोत्तर असेच सन्मान प्राप्त होत राहोत ही सदीच्छा…

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा