You are currently viewing निळाई..

निळाई..

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निळाई…*

 

निळ्या नभाची निळी निळाई

हवीहवीशी वाटे मला

निळ्या नभातील तो चांदवा

त्याचा वाटे हेवा मला

निळ्या नभाची…

 

निळ्या नभामध्ये उंच जावे

लुकलुकणारी चांदणी व्हावे

गुढ शांतता रंग नभाचा

हवाहवासा वाटे मला

निळ्या नभाची…

 

गडबड गोंधळ गर्दी सारी

घुसमट घुसमट होई मला

चांदणी होऊन पांघरीन मी

नभातील त्या निळाईला

निळ्या नभाची….

 

ऐकण्यास ना येईल तेव्हा

पृथ्वीवरचा कल्लोळ मला

निळ्या नभातील एक चांदणी

होईन मी व्हायचेच मला

निळ्या नभाची…

 

@अरुणा गर्जे

नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा