You are currently viewing शब्द जाहले मुके आता

शब्द जाहले मुके आता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्द जाहले मुके आता*

 

बाप्पा तुम्ही जाता जाता

शब्द जाहले मुके आता….

 

मखरामधे रुपडे नाही

पाट रिकामा इथेच राही…

 

हार फुले ही सुकून गेली

दूर्वा जुडी मलूल झाली….

 

चैतन्याने भरलेले क्षण

प्रसाद आरती धूपदीपार्चन…

 

सवंगड्यांना भेटायाचे

हसरी वदने दिसावयाचे….

 

शांत जाहला मंडप परिसर

तू निघताना भरतो रे ऊर….

 

सद्बुद्धी तू दे सकलांना

हीच मागणी तुला गजानना..‌

 

उणे जाहता ,क्षमा प्रार्थना

पुढच्या वर्षी धावत ये ना….!!

 

००००००००००००००००००

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा