महाराष्ट्रात ५५०० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाविषयी माहिती दिली.
राज्यात ५५०० कोटींची कामे महाराष्ट्रात मंजूर झाली आहेत, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली. ५७ हजार कोटी रुपये महामार्गासाठी खर्च केला आहे. १८०० कोटी रुपयांची सीआरएफही लवकरच देणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा घेतला आहे, आता मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा आढावा घेतल्याचेही गडकरींनी सांगितले.
सध्या ५२३ प्रकल्प राज्यात सुरू असून, एकूण १४,४०९ किमी मार्गाचे एक लाख ३७ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. आज ५ हजार ५०० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. दोन्ही पालखी मार्गमध्ये काम सुरू झाले आहेत, असेही गडकरींनी सांगितले. पुणे चांदणी चौकबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-हैदराबाद-चेन्नई असा मार्ग करत आहोत. यामुळे उत्तर दक्षिण वाहतूक वेगवान होणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. नागपूर-हैदराबाद महामार्ग बांधत आहोत. एक वर्षाच्या आत मुंबई गोवा मार्ग रूंदीकरणाचे काम पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.