You are currently viewing वेंगुर्ले येथे २० सप्टेंबर रोजी बागायतदार संघटनेची सभा

वेंगुर्ले येथे २० सप्टेंबर रोजी बागायतदार संघटनेची सभा

वेंगुर्ले :

 

सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाची बैठक २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ले प्रादेशिक फाळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सभेत प्रामुख्याने विमा विषयावर चर्चा होणार आहे. ज्या रिलायन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांचा विमा हेक्टरी ४२ हजार रूपये भरला गेला, मात्र, १५ जुलैपर्यंत नुकसान भरपाई देणे क्रमप्राप्त असताना अद्यापपर्यत नुकसान भरपाई न दिल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी आहे. आता हेक्टरी फक्त २८ हजार रूपये मंजूर झाल्याचे वृत्त असल्याने आंबा उत्पादकांचेनुकसान होणार आहे. तुटपुंज्या नुकसान भरपाईमुळे कंबरडे मोडण्याचा प्रकार विमा कंपनीकडून होत आहे. या संदर्भात आंबा व काजू उत्पादक शेतकरी- बागायतदारांनी संघटीतपणे आंदोलनात्मक दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकीस उपस्थित राहवे, असे आवाहन संघटनेचे सचिव ॲड. प्रकाश बोवलेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा