You are currently viewing भावनां अंतरीची

भावनां अंतरीची

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भावनां अंतरीची*

****************

सात्विकी चेहरा तुझाच

लडिवाळी तोही लाघवी

परी अबोली तूच लाजरी

प्रीती व्यक्त कशी करावी

 

भावनां अंतरीची बोलकी

शब्दात कशी मी सांगावी

तू प्रिया भावुक निरागस

तुला प्रीत कां न कळावी

 

कळेना ना मलाही काही

हीच सत्यता कशी वदावी

तुझीच ही गूढ अव्यक्तता

सांग मीच कशी उमजावी

 

संपता आता आयुष्य सारे

प्रतिक्षा तरी किती करावी

जाणूनी आहे तसे सारे मी

तरी स्मृती कशी विसरावी

**********************

*रचना क्र. १५३/

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा