You are currently viewing बाप्पा मोरया

बाप्पा मोरया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप्पा मोरया*

 

 

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होते आगमन

अनंत चतुर्थीस करायचे विसर्जन

 

म्हणती गणपतीला सुखकर्ता, दुखहर्ता

तोच सिध्दीदाता, आणि सकल सृष्टीचा कर्ता-

 

गणपतीला प्रार्थना करावी मनापासून

प्रसन्न झाल्यावर घ्यावे वरदान मागून

 

दहा दिवसांचा पाहुणा, आवडता मुलांचा

सोहळा अनुपम असे गणेशपूजनाचा

 

आवडती लाल फुले जास्वंदीची गणेशास

एकवीस दुर्वा, गोड मोदकांचे वेड खास

 

पार्वतीचा बाळ, साऱ्या जगताचा राजा

मूषक वाहनावरी वाटे त्यास मोठीमजा

 

भाव भक्तीचा भुकेला,करू गणपती भक्ती

आदराने करू विनवणी देसी मज शक्ती

 

विनम्रतेने मागणे गणपतीला प्रेमाचे

 

यावेत भाविकांच्या जीवनी दिवस सुखाचे

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा