बांदा :
राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेत सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मंडळाच्या वतीने मंत्री केसरकर यांचा श्रीफळ व प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
दरवर्षी मंत्री केसरकर हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत भेट देत असतात. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर, भाऊ वाळके, संदेश पावसकर, अनिल नाटेकर, भैय्या गोवेकर, दत्तप्रसाद पावसकर, साईराज साळगावकर, बांदा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मकरंद तोरस्कर, सिद्धेश महाजन, बाळा आकेरकर, अर्णव स्वार, ऋषी हरमलकर, ज्ञानेश्वर येडवे, अक्षय नाटेकर, प्रतीक नार्वेकर, अनिकेत येडवे आदी उपस्थित होते.