मुंबई-गोवा महामार्गावर एसटीचा अपघात…
स्टेरिंग फ्री झाल्याने घडला अपघात:२० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी..
कुडाळ:
मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास एसटी बसचा अपघात घडला. बसचे स्टेरिंग अचानक फ्री झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि पार्किंग करुन ठेवलेल्या ट्रकवर बस आदळली. या अपघातात २० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अपघातग्रस्त एसटी बस मालवणहून कोल्हापूरकडे निघाली होती. त्यावेळी महामार्गावरील कसाल ब्रीजवर हा अपघात घडला.