You are currently viewing नाद पियाळी नदीकिनारी आढळला वृद्धाचा सडलेला स्थितीत मृतदेह…

नाद पियाळी नदीकिनारी आढळला वृद्धाचा सडलेला स्थितीत मृतदेह…

नाद पियाळी नदीकिनारी आढळला वृद्धाचा सडलेला स्थितीत मृतदेह…

देवगड

कणकवली तालुक्यातील दोन महिन्यापुर्वी असलदे दिवाण सानेवाडी येथून बेपत्ता झालेल्या धाकू लक्ष्मण मयेकर(७५) या वृध्दाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.सुमारास नाद पंखेवाडी येथील पियाळी नदीच्या किनाऱ्यावर आढळला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी गेलेल्या ग्रामस्थांना नाद पंखेवाडी येथे पियाळी नदीच्या किनाऱ्यायावर सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्यांनी याबाबत तेथिल पोलिस पाटील स्वरा संतोष तेली यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी देवगड पोलिस स्टेशनला तात्काळ कळविले. देवगड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक एच्.बी.खोपडे, पोलिस हवालदार आशिष कदम, पो.कॉ.स्वप्नील ठोंबरे,होमगार्ड झाजम, जाधव आदींनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला.यावेळी कणकवली असलदे येथून १७ जुलै २०२४ बेपत्ता झालेल्या धाकू लक्ष्मण मयेकर याचा शोध सुरू असल्याने कणकवली पोलिस व बेपत्ता मयेकर यांचा मुलगा विजय मयेकर, गावातील ग्रामस्थ हे शनिवारी देवगड ग्रामीण रूग्णालय येथे आले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली यावेळी कपडे व दोरी बांधलेला चष्म्यावरून ओळख पटली व हा मृतदेह धाकू मयेकर यांचाच असल्याचे सांगीतले.या घटनेची देवगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून तपास पोलिस निरिक्षक एच्.बी.खोपडे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा