*सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटनांनी एकत्र यावे!*
*उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल ग्रुप, एनजीओज यांचा पुरस्कारासह कोकण एनजीओ फेडरेशन गौरव करणार – सहभाग नोंदवण्याचे फेडरेशन तर्फे आवाहन*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, एन.जी.ओ, विविध संघटना, गावातील नोंदणीकृत/अनोंदणीकृत युथ ग्रुप्स यांच्याकरिता कोकण एनजीओ फेडरेशनतर्फे आयोजित “सिंधुदुर्ग एनजीओ समिट-2024” उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या दिवाळीमध्ये होणाऱ्या *सिंधुदुर्ग एनजीओ समिट-2024* या भव्य कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध संस्थांमधुन निवड करत पात्र संस्थांना पुरस्कार देत सन्मानपूर्वक सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष श्री.अविनाश पराडकर, कार्याध्यक्ष श्री.भालचंद्र राऊत आणि सचिव श्री चंद्रशेखर (राजू) पुनाळेकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ज्या गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यटन, पर्यावरण, ज्येष्ठ नागरिक सेवा, महिला सक्षमीकरण, आध्यात्मिक उन्नती आदी कोणत्याही जनहितकारी सामाजिक क्षेत्रात सेवात्मक कार्य करणारे जे स्थानिक ग्रुप असतील, एनजीओ, ग्रामस्थ मंडळे, ट्रस्ट आदी असतील त्यांनी कोकण एनजीओ फेडरेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन एनजीओ फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश पराडकर, कार्याध्यक्ष श्री भालचंद्र राऊत आणि सचिव श्री चंद्रशेखर(राजू) पुनाळेकर यांनी केले आहे. यात सहभागी होणाऱ्या संस्था नोंदणीकृत असल्यास पाहिजेत अशी अट नाही. उत्कृष्ट काम करणारे व्हाट्सअप ग्रुपदेखील यात सहभागी होऊ शकतात. त्यांचाही स्वतंत्रपणे विचार केला जाईल.
यात सहभागी होण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या एनजीओ अथवा वर उल्लेखित संस्था/संघटना/ग्रुपने आपले नाव, पत्ता आणि त्यात काम करणाऱ्या संचालक सदस्यांची नावे, तसेच सर्वांचा मोबाईल क्रमांक नमूद असलेली माहिती पुढील गुगल फॉर्मवर भरून पाठवावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfcQL8SC0arwf7PuRRWVDubdRIum4OIiRybaylt8w_nuT0VNg/viewform
सहभागी होण्यासाठी संस्था अथवा ग्रुप नोंदणीकृतच असायला हवा ही अट नाही. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल ची माहिती, अहवाल खात्रीने पुढील गुगल फॉर्म भरून पाठवणे आवश्यक आहे. त्यांच्या सामाजिक कामाची पाहणी फेडरेशन मार्फत करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचा पुरस्कारासंबंधात विचार करण्यात येईल. सहभागी सर्व ग्रुप आणि संस्था यांना सहभाग प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह यांचे वितरण जाहीर कार्यक्रमामध्ये करण्यात येईल. याबाबत निर्णय घेण्याचा आयोजकांचा अधिकार अंतिम राहील.
जास्तीत जास्त सामाजिक संस्था, संघटना व सामाजिक ग्रुप्सनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन एनजीओ फेडरेशनद्वारे करण्यात आले आहे.