You are currently viewing नवीन फौजदारी कायद्यानुसार ई-तक्रार सुविधा

नवीन फौजदारी कायद्यानुसार ई-तक्रार सुविधा

नवीन फौजदारी कायद्यानुसार ई-तक्रार सुविधा*

सिंधुदुर्गनगरी

फौजदारी नवीन कायद्यामुळे नागरिकांना आता देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे. ई-तक्रारीवरुन पोलीस प्राथमिक तपास सुरु करुन पुरावे जमा करतात. मात्र, त्यानंतर तीन दिवसात तक्रारदाराला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी लागणार आहे. त्यानंतरच गुन्हा दाखल होणार आहे. भारतीय न्यायसहिंता, भारतीय

नागरिक सुरक्षासंहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीला 9 जुलैपासून सुरुवात झाली. त्यातील तरतूदीनुसार पोलीस ठाण्यात सर्व प्रक्रियेचे ऑडिओ, व्हीडिओ रेकॉर्डीग करावे लागते. त्यामुळे आता मोबाईल ई- मेलवरुन ही तक्रार करता येणार आहे. पूर्वीचा कायदा हा आरोपी केंद्रीत होता. मात्र, नवीन कायदा न्याय केंद्रीत आहे. या बदलानंतर आता छायाबित्रण, सीसीटीव्ही चित्रण, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले

संभाषण, फोन रेकॉर्ड आदी तांत्रिक पुराव्यांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप वरुनही तक्रार करता येणार आहे. तक्रार देण्यासाठी व्यक्तींचा जबाब, आलेल्या त्याआधारे नोंद होणारे दखलपात्र गुन्हे, पुरावे गोळा करताना बंधनकारक असलेले पंचनामे, साक्षीदार आणि आरोग्याचे जबाब, शोधमोहीम, झडती, अटक आदी सर्व प्रक्रिया ऑन कॅमेरा घेण्याची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आलेली आहे. ई-तक्रार करताना झिरो एफआयआरद्वारे नागरिक कुठूनही तक्रार नोंदवू शकतात. पुढे तो गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग होईल, याशिवाय ई-तक्रार करण्याची सुविधा या कायद्यांतर्गत आहे. ई-तक्रारीवरुन पोलीस प्राथमिक तपास सुरु करुन पुरावे जमवतील. मात्र, पुढील तीन दिवसात तक्रारदाराला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी लागणार आहे व त्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा