You are currently viewing जेष्ठ साहित्यिक श्री-जगन्नाथ खराटे यांच्या “सुविचार सुगंधा” साहित्यकृतीस, अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर..

जेष्ठ साहित्यिक श्री-जगन्नाथ खराटे यांच्या “सुविचार सुगंधा” साहित्यकृतीस, अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर..

ठाणे –

ठाणे, येथील जेष्ठ साहित्यिक, कवी, समाजसेवक – जगन्नाथ खराटे यांच्या शॉपिंजन प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या “सुविचार सुगंधा” ह्या सुविचार संग्रहास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मातंग साहित्यपरिषद पुणे, ह्यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी आयोजित केलेल्या, साहित्य संमेलनात पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दि. ११ फेब्रुवारी रोजी पिंपरी पुणे, येथील आयोजित साहित्य संमेलनांत या पुरस्काराचे वितरण पद्मश्री, गिरीश प्रभुणे, स्वागत अध्यक्ष शंकरशेठ जगताप आणि डॉ संस्थापक अध्यक्ष डॉ-धनंजय भिसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. जेष्ठ साहित्यिक, जगन्नाथ खराटे- यांचे “अध्यात्माच्या प्रांगणात” लेखसंग्रह,”रंग जीवनाचे”, लघुकथा संग्रह, काळोखातील दिवे” समाजसेवी व्यक्तीकार्य, साहित्य प्रकाश दिपावली विशेषांक,इ साहित्य प्रसिद्ध आहे. तसेच साहित्य विषयक अनेक समाजसेवी उपक्रम आयोजित करुन समाजसेवी, कार्य करीत आहेत. जगन्नाथ खराटे, “वक्रतुंड”साहित्य मंच ठाणे,चे अध्यक्ष असुन ह्यांच्या पुरस्कारासाठी निवडीबद्दल, मंचातील मान्यवर, सुभाष बिडकर‌ प्रा-श्रदृधाजी शेट्ये, मनिषा जोशी, लैलेशा भुरे, गोरखनाथ पवार, निर्मला बस्तवडे, योजना घरंत, डॉ,शुभांगी गादेगावकर आदी मान्यवरांनी मनःपुर्वक अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eight =